F.Y B.A Unit II नामदार गोपाळ कृष्ण गोखले

 


ब) मवाळ कालखंडातील राष्ट्रीय काँग्रेसची कामगिरी (इ.स. १८८५ ते १९०५) : 

कालखंडातील राष्ट्रीय काँग्रेसची कामगिरी पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येईल

१) राष्ट्रवादी भावनेची वाढ                                              (२) राष्ट्रीय काँग्रेसने राजकीय, आर्थिक, सामाजिक गान्हाणी मांडली "

३) काँग्रेसचे इंग्लंडमधील कार्य                                        ४) वसाहतीचे स्वराज्य हेच ध्येय

५) १८९२ चा कायदा                                                    ६) राष्ट्रीय चळवळीचा पाया

७) आर्थिक शोषणाचा सिद्धांत ८) इंडिया कौन्सिल


१) राष्ट्रवादी भावनेची वाढ
राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतर सन १८८५ ते १९०५ या प्रारंभीच्या काळामध्ये राष्ट्रीय काँग्रेसने भारतीय जनतेमध्ये राष्ट्रवादाची भावना वाढवण्याचे कार्य केले. आपण सर्व भारतीय एक आहोत आणि ब्रिटिश 'साम्राज्याला आपल्याला विरोध करावयाचा आहे याची जाणीव त्यांनी भारतीयांच्या मनामध्ये निर्माण केली.

२) राष्ट्रीय काँग्रेसने राजकीय, आर्थिक, सामाजिक गान्हाणी मांडली : 
राष्ट्रीय काँग्रेसने भारतीयांच्या प्रश्नांचा विचार करण्यास ब्रिटिशांना भाग पाडले. भारतीयांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये घ्यावे, नोकऱ्यांमध्ये स्थान द्यावे, स्पर्धा परीक्षा भारतात घ्याव्यात, परीक्षेसाठी उमेदवारांच्या वयोमर्यादा कमी कराव्यात अशा मागण्या ब्रिटिशांकडे राष्ट्रीय काँग्रेसने केल्या. त्यांनी नुसत्याच मागण्या केल्या नाहीत तर त्यासाठी चळवळी करण्यास लोकांना प्रवृत्त केले.

३) काँग्रेसचे इंग्लंडमधील कार्य 
सन १८८८ साली डिग्बी यांच्या मार्गदर्शनाखाली एक समिती लंडनला स्थापन करण्यात आली.- भारताबद्दल सहानुभूती असणाऱ्या महत्त्वाच्या ब्रिटिश व्यक्तींशी संपर्क साधून भारतीयांच्या मागण्या ब्रिटिश पार्लमेंटसमोर मांडण्यासाठी त्यांचे सहकार्य मिळवणे व काँग्रेसच्या कार्याची माहिती करून देणे हे उद्दिष्ट राष्ट्रीय काँग्रेसने समोर ठेवले. १८८९ साली 'ब्रिटिश कमिटी ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस' स्थापन झाली. १८९० साली 'इंडिया' नावाचे वृत्तपत्र प्रकाशित केले जाऊ लागले. १८९३ मध्ये ब्रिटिश संसदेत 'इंडियन पार्लमेंट कमिटी' स्थापन करण्यात आली. या संघटनेच्या सूचनेवरून काँग्रेसची प्रतिनिधी मंडळे इंग्लंडमध्ये पाठविली जात असत. भारतीयांच्या प्रश्नांकडे ब्रिटिशांचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचे हे कार्य महत्त्वाचे आहे. 

४) वसाहतीचे स्वराज्य हेच ध्येय :
सन १८८५-१९०५ या काळात काँग्रेसचे धोरण मवाळ राहिले. मात्र ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी 'धोरणाने व कर्झनच्या दडपशाहीने काँग्रेसने आपल्या धोरणात बदल केला व १९०५ च्या वाराणसी येथील अधिवेशनात न्यायमूर्ती गोखले यांनी अध्यक्षीय भाषणात 'वसाहतीचे स्वराज्य हे काँग्रेसचे ध्येय राहील' असे जाहीर केले.

५) १८९२ चा कायदा :
सन १८८५ पासून दरवर्षी होणाऱ्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये अनेक मागण्यांपैकी प्रशासनात भारतीयांचा सहभाग ही एक मागणी होती. सततच्या पाठपुराव्यांमुळे ब्रिटिशांना १८९२ चा कायदा मंजूर करावा लागला. त्यानुसार भारतीयांना प्रशासनात सहभाग मिळाला.

६) राष्ट्रीय चळवळीचा पाया : 
मवाळ कालखंडामध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रीय चळवळीचा पाया घातला. भारतीयांमध्ये राष्ट्रवाद जागृत करण्याचे कार्य त्यांनी केले. तेव्हा राष्ट्रीय संघटना म्हणून काँग्रेसने मान्यता मिळवली. 

७) आर्थिक शोषणाचा सिद्धांत :
भारतातील दारिद्र्याला आणि वाढत्या आर्थिक समस्येला ब्रिटिश साम्राज्यवाद कारणीभूत आहे हे। प्रथम दादाभाई नौरोजी यांनी भारतीयांसमोर आणले. १८७६ साली त्यांनी आर्थिक निःस्सारणाचा सिद्धांत मांडला. न्यायमूर्ती रानडे यांनीही आर्थिक राष्ट्रवादाला चालना दिली. स्वदेशी व बहिष्कार याद्वारे ब्रिटिशांच्या आर्थिक आव्हानाला सुरुवात झाली. 

८) इंडिया कौन्सिल :
१८५८ ला राणीच्या जाहीरनाम्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपून भारताचा राज्यकारभार ब्रिटिश संसदेकडे सोपविण्यात आला. यानुसार इंडिया कौन्सिलची स्थापना करण्यात आली. मात्र यातील भारतमंत्री व इतरांच्या वेतनाचा बोजा भारतीय तिजोरीवर टाकण्यात आला. यास कांग्रेसने । विरोध दर्शवून इंडिया कौन्सिलचे वेतन ब्रिटिश संसदेने द्यावे अशी मागणी पहिल्या अधिवेशनापासून केली.

सारांश :
थोडक्यात मवाळवादी नेते भारतावरील इंग्रजांच्या प्रशासनाला ईश्वरी वरदान मानीत होते. टप्प्याटप्प्याने त्यांच्याकडून भारतात सुधारणा घडवून आणून नंतर भारतांतील राजकीय सत्ता हातात घ्यावी असे त्यांना वाटत होते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात त्यांनी स्वातंत्र्याची मागणी केली नाही. नंतरच्या काळात मात्र त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध जनमत तयार केलेले व भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण केलेली दिसून येते. 

 मवाळमतवादी/नेमस्तांचे राष्ट्रीय चळवळीतील योगदान

पुढील मवाळमतवाद्यांची राष्ट्रीय चळवळीतील भूमिका अत्यंत महत्त्वाची असून त्यांनी या चळवळीत आपले महत्त्वाचे योगदान दिले आहे.

१) दादाभाई नौरोजी (आधुनिक भारताचे पितामह) :

भारतीय राष्ट्रवादाला आर्थिक समीक्षेची जोड देण्याचे अत्यंत महत्वपूर्ण कार्य दादाभाई नौरोजींनी केले. सुरुवातीला त्यांनी सहप्राध्यापक, प्राध्यापक, ज्ञानप्रसारक सभेचे कार्यकर्ते व रास्त गोफ्तार या वृत्तपत्राचे जनक, बॉम्बे असोसिएशनचे एक संस्थापक अशा भूमिका बजावल्या व त्या मार्गाने देशसेवा केली. नंतर ते कामा कंपनीचे प्रतिनिधी म्हणून इंग्लंडला गेले. तेथील आर्थिक परिस्थितीचा त्यांनी अभ्यास केला व भारतीयांना स्वतःचे उद्योग व्यवसाय उभे करण्यास प्रोत्साहित केले. त्यापासून प्रेरणा घेऊन जमशेटजी टाटा यांनी भारतातील प्रथम उद्योग-पोलाद उद्योगाचा पाया घातला. इंग्रजांकडून भारतीयांचे होणारे आर्थिक शोषण त्यांनी सर्वांसमोर आणले होते. त्यांचे विचार काहीसे जहाल बनू लागले. स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण, स्वराज्य या चतुःसूत्रीचा पुरस्कार करून 'करा' हा संदेश त्यांनी लोकांना दिला.

२) न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे

१८५७ च्या उठावाच्या अपयशाने संपूर्ण देश अचेतन झाला होता. देशाला चैतन्य प्राप्त करून देणारे पहिले नेतृत्व म्हणजे 'न्यायमूर्ती रानडे' होय. स्वतः सरकारी नोकरी करत असताना त्यांनी प्रार्थना समाजाचे, सार्वजनिक सभेचे कार्य केले. 'इंदूरकाश' मध्ये लेखन करून जनजागृती घडवून आणली व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दुरावस्थेची पाहणी करून त्यास सरकारचे महसूल धोरण जबाबदार सानिकानून तो लोकांसमोर व सरकारसमोर मांडला. दुष्काळाचे विश्लेषण, आर्थिकदृष्ट्या पाहणी करून आकडेवारी मांडणारी पहिली तज्ज्ञ व्यक्ती म्हणून न्यायमूर्ती रानडे यांचे नाव घेतले जाते. काँग्रेस अधिवेशनात सामाजिक परिषद घेण्याची कल्पना मांडून त्यांनी ती प्रत्यक्षात आणण्याचे कार्य केले.

३) फिरोजशहा मेहता
फिरोजशहा हे ह्यूम यांचे सुरुवातीचे सहकारी होते. त्यांचा ब्रिटिशांच्या उदारमतवादावर प्रचंड विश्वास होता व जन आंदोलनास विरोध होता. १८९० च्या काँग्रेस अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी प्रातिनिधिक शासन यंत्रणेचा पुरस्कार केला.

४) नामदार गोपाळ कृष्ण गोखले

राष्ट्राची सेवा करण्यासाठी गोखले यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. 'सुधारक' या आगरकरांच्या पत्राचे सहसंपादक म्हणून त्यांनी कार्य केले. १८९५ साली काँग्रेसचे चिटणीस म्हणून व १९०५ सालच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी राष्ट्रीय सभेचे काम पाहिले. १९०५ साली त्यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. प्राथमिक शिक्षण विनामूल्य व सक्तीचे करण्याची मूळ कल्पना गोखल्यांची होती. तांत्रिक शिक्षण संस्थांची स्थापना, भारतीय उद्योगधंद्यांची वाढ यासाठी त्यांनी विधायक सूचना केल्या. प्रांतिक स्वायत्तता व केंद्रीय विधिमंडळात भारतीयांना बहुमत मिळेल अशी योजना त्यांनी ब्रिटिश सरकारला सादर केली. गोखल्यांच्या कार्याने महात्मा गांधी प्रेरित झाले होते त्यामुळे त्यांनी गोखल्यांना आपले राजकीय गुरु मानले होते.


Comments

Popular posts from this blog

टी वाय बी ए सेमिस्टर६ इतिहास पेपर नंबर 6

टी वाय बी ए सेमिस्टर६ इतिहास पेपर नंबर ४ मध्ययुगीन भारताचा इतिहास मुघल काळ (१५२६-१७०७) VIMP Notes