TYBA History Paper No -V Module- I ( Sem-V)

                                          

TYBA History Paper No -V  Module- I ( Sem-V)

               ब्रिटीश साम्राज्याची स्थापना आणि १९ व्या शतकातील महाराष्ट्राचीसामाजिक व आर्थिक स्थिती VIMP

                                   ईस्ट इंडिया कंपनीने हिंदुस्थान आपल्या हुकमतीखाली आणण्यास जवळजवळ १०० वर्षे घेतली. मोगल बादशहाकडून व्यापारासाठी सवलती मिळवून ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या समुद्रकिनान्यावरच्या मोक्याच्या जागी बखारी बनवल्या. इ.स. १७०७ मध्ये औरंगजेबच्या मृत्यूनंतर मोगल साम्राज्य मोडकळीस आले. प्रांतोप्रांतीचेमोगलांचे सुभेदार प्रत्यक्षतः स्वतंत्र राजे असल्यासारखे वागू लागले. औरंगजेबाच्या प्रचंड फौजेशी २७ वर्षे देऊन स्वराज्याचे रक्षण करणारे मराठे दक्षिणेत पुन्हा सरसावले. पुढे सातारचे छत्रपती नामधारी बनले तरी त्यांच्या नावे हुकूमत गाजविणाऱ्या पेशव्यांनी अटकेपर्यंत भरारी मारली पण मराठ्यांना या खंडप्राय देशावर आपली निर्विवाद अधिसत्ता कधीच प्रस्थापित करता आली नाही. हैदराबदचा निजाम, बंगालचा नवाब, रोहिले यांचे सबते सुभे मराठ्यांना पुरते उखडून टाकता आले नाहीत. मराठ्यांच्या फौजा दिल्लीत धडक देत राहिल्या. दिल्लीचे सिंहासन त्यामुळे हादरले पण कोसळले नाही. भारताच्या अन्य भागातील लोकांना मराठ्यांच्या समशेरीचा पाक वाटला तरी एखाद्या वावटळीप्रमाणे येणाऱ्या मराठ्यांच्या फौजांविषयी राजपुतांना किंवा जाटांना अगर बंगाल- ओरिसातील हिंदूंना कधीच आत्मीयता वाटली नाही. इंग्रज किंवा फ्रेंच यांच्यासारख्या परक्यांच्या वाढत्या राजकीय हालचालींना पायबंद घालणे मराठ्यांना जमले नाही. भारतातील अस्थिर राजकीय परिस्थितीचा. येथील राजे-रजवाड्यांमधील दुहीचा व स्पर्धेचा फायदा घेऊन ईस्ट इंडिया कंपनीचे क्लाईव्ह व वॉरन हेस्टींग्जसारखे महत्वाकांक्षी व साहसप्रिय अधिकारी हळूहळू येथील राजकारणात हस्तक्षेप करु लागले. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात १७५७ च्या प्लासीच्या लढाईने भारतातील इंग्रजांच्या साम्राज्याचा पाया घातला गेला.

पेशव्याच्या घरातील भाऊबंदकीचा फायदा घेऊन मुंबईकर इंग्रजांनी प्रथम रघुनाथरावांना आणि नंतर दुसन्या बाजीरावाला आपल्या हातातील बाहुले बनवले. इ.स. १८०२ च्या वसईच्या तहानंतर दुसरा बाजीराव इंग्रजांचा मांडलिक बनला होता. पण लवकरच पेशवे व इंग्रज यांच्या बेबनाव होऊन मराठे व इंग्रज यांच्यात संघर्ष होऊन त्यात मराठ्यांचा पूर्ण पराभव झाला. १३ जून १८१७ च्या तहाने बाजीरावची अवस्था अधिकच केविलवाणी झाली. २ नोव्हेंबर रोजी लेप्टनंट शॉ हा इंग्रज अधिकारी व विश्रामसिंग हा पेशव्यांचा नाईक यांच्यातील तंटा हातघाईवर आल्याने ठिणगी पडली. ५ नोव्हेंबरला खडकीस व १५ नोव्हेंबरला घोरपडीस झालेल्या चकमकी जिंकून १७ नोव्हेंबरला इंग्रज फौजा पुण्यात घुसल्या. एलफिन्स्टनला फितूर झालेल्या घरभेद्या बाळाजीपंत नातूने त्याच दिवशी शनिवार वाड्यावरचा भगवा ध्वज उतरवून त्याऐवजी इंग्रजांचे युनियन जॅक निशान फडकावले.

सातारचे तरुण छत्रपती प्रतापसिंह महाराज हे १८०८ सालापासून नजरकैदेत असल्यासारखेच होते. ११ एप्रिल १८१८ रोजी इंग्रजांनी प्रतापसिंह महाराजांना सातारच्या गादीवर बसवले तरी प्रत्यक्षात कारभाराची सूत्रे कॅप्टन जेम्स गँट डफ हा रेसिडंट व त्याचा साहाय्यक बाळाजीपंत नातू यांच्या हातात होती. १८१८ मध्ये पेशवाईची समाप्ती होऊन इंग्रज राज्य प्रस्थापित झाले.

इ.स. १८३९ साली प्रतापसिंहचे बंधू शहाजी राजे उर्फ अप्पासाहेब भोसले यांना फितवून बाळाजी पंत नातू यांच्या मदतीने मुंबईचा गव्हर्नर कारनॅक, सातारचा रेसिडंट ओवेन्स वगैरेंनी प्रतापसिंहास पदच्यूत केले. छत्रपतींवर झालेल्या या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी प्रथम यशवंतराव शिर्के व नंतर रंगो बापूजी गुप्ते विलायतेस गेले. रंगो बापूजींनी काही इंग्रजांच्या मदतीने १८४० पासून १३-१४ वर्षे इंग्लंडमधल्या वास्तव्यात प्रतापसिंहची बाजू व्याख्यानातून वृत्तपत्रातून व न्यायालयातून मांडली पण हे सर्व प्रयत्न विफल ठरले. १४ ऑक्टोबर १८४७ रोजी प्रतापसिंह महाराजांचे निधन झाले, त्यांची जागा पटकावणारे व्यसनी अप्पा साहेबही ७ एप्रिल १८४८ रोजी मृत्यू पावले. त्यांचा दत्तकपुत्र नामंजूर करून गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीने सातारचे संस्थान खालसा केले. दरम्यान कोल्हापूरचे भोसले, बोद्याचे गायकवाड, स्वाल्हेरचे शिंदे, इंदूरचे होळकर, धारचे पवार, जामखिंडी, सांगली, मिरज, कुरुंदवाडचे पटवर्धन, भोरचे पंत, सचिव, अधिचे पंतप्रतिनिधी, जतचे डफळे, अक्कलकोट व सावंतवाडीचे भोसले वगैरे छोटे छोटे संस्थानिक सरदार जहागिरदार इंग्रजांचे अंकित बनले होते आणि तहनाम्यांनी पुरते जडले गेले होते. इ.स. १८५० पर्यंत संपूर्ण हिंदुस्थानात इंग्रज साम्राज्यास प्रारंभ झाला.

महाराष्ट्राची सामाजिक स्थिती :

१) जातीव्यवस्था:
                       जातीव्यवस्थेच्या उगमासंबंधीच्या पारंपारिक सिद्धांतानुसार जात ही ऐतिहासिक काळाएवढी प्राचीन आहे आणि वैदिक काळात वर्णव्यवस्थेअंतर्गत जातीने आद्यस्वरूप धारण केले ही एक वैदिक काळातील साधी चार वर्णाची व्यवस्था होती. परंतु काळाच्या ओघात ती गुंतागुंतीच्या आणि विस्तृत व्यवस्थेच्या रुपात वाढली. ही व्यवस्था पित्याकडून मुलाकडे सोपवली गेली त्यामुळेच ती बदललीही नाही आणि समूळ नष्टही झाली नाही. मराठा काळात जातही तुलनेने स्थिर राहिली आणि नंतरच्या काळात अनेक आघातांना सामोरी जात ती उपजातीमध्ये खंडित झाली. एखाद्या व्यक्तीला त्याची जात बदलणे किंवा जातीच्या शिकवणुकीपासून सुटका करून घेणे शक्य नव्हते. जरी त्याने आपला धर्म बदलला तरी जातीचा प्रभाव कायम असे काहींच्या मतानुसार देशात जातीव्यवस्थेचा उदय होण्यामागे त्या त्या व्यक्तीचा व्यवसाय हा सर्वात महत्त्वाचा घटक मानला गेला. प्रत्येक जात ही निश्चित व्यवसायाशी घट्ट जोडली गेली होती, जर एखादी व्यक्ती त्याच्या जातीशी संबंधीत असलेला व्यवसाय सोडू इच्छित असेल तर त्याला तसे करण्याची परवानगी दिली जात नसे. प्रत्येक समाजगटाने आपल्या सभासदांना इतर कुठलाही व्यवसाय करणे कसे अपवित्र किंवा हलक्या दर्जाचे काम आहे असे बिंबवून त्यापासून परावृत्त केले जात असे. एखाद्या व्यक्तीने आपला स्वतःचा व्यवसाय सोडून आकर्षणापोटी इतर व्यवसाय निवडला तर त्याच्या स्वतःच्या समाजगटामार्फत त्याच्यावर एकप्रकारे नैतिक बंधनच आहे असे बिंबवून त्यास परावृत्त केले जाई. दुसऱ्या समाजगटातील लोकांद्वारे आपल्या व्यवसायावर अतिक्रमण होत आहे असे जेव्हा वाटे त्यावेळेस आर्थिक घटकांशिवाय समाजगटातील इतर सभासदांचा त्याला जोरदार आक्षेप असे.

व्यक्ती ज्या विशिष्ट जातीत जन्माला येई त्याला त्या जातीला असलेलाच दर्जा प्राप्त होत असे. परंतू वंशपरंपरेने आलेला विधिवत दर्जा हा कुठल्याही प्रकारे वरच्या स्तरावर नेला जात नसे, काही प्रसंगी बेकायदेशिररित्या जन्माला आलेल्या लहान मुलांचा दर्जा हा कायदेशीर जन्माला आलेल्या मुलांच्या दजपिक्षा हलक्या प्रतीचा मानला जाई. पाकियापेक्षा अपावित्र्याचाच प्रभाव जास्त असे. खालच्या जातीच्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने उच्च जातीय व्यक्ती अपवित्र होतात परंतु खालच्या जातीची व्यक्ती उच्च जातीय व्यक्तीच्या संपकनि पवित्र झाली असे मात्र कधीच समजले जात नसे.खालच्या जातीच्या लोकांवर प्रामुख्याने अस्पृश्य समाजावर अधिक बंधने लादलेली होती. खालच्या जातीतील माणसाने शिजवलेले अन्न उच्च जातीयांना घेण्यास प्रतिबंध, त्यांच्या हाताने पिण्यास पाणीही न घेणे, त्यांच्यासोबत जेवण न करणे, विवाहसंबंध न जोडणे अशी अनेक बंधने होती. तसेच काही जाती। अस्पृश्य ठरवून त्यांचे नागरी हक्क काढून घेतले गेले होते. गावातील अत्यंत हीन कामे त्यांना दिली जात. अस्पृश्य जातींना गावचा पुजारी, न्हावी यांच्याकडून कामे करून घेता येत नसे, गावातील विहीरीतून पाणी नेण्यास मज्जाव होता, बेदांचे किंवा संस्कृतचे अध्ययन करण्यास मनाई होती. मंदिर प्रवेशबंदी होती.मध्ययुगीन काळात जाती, पंथ, प्रांत अशा विविध गोष्टीत विभाजीत झालेल्या व मुस्लिमांच्या अत्याचाराने शिबील झालेल्या हिंदू समाजाला एकत्र करण्याचा तसेच ब्राह्मण्य बाद, अस्पृश्यता, श्रेष्ठ, कनिष्ठता दूर करण्याचे प्रयत्न संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा या संत परंपरेने केले. त्यातून वारकरी संप्रदाय निर्माण होऊन सर्व जाती जमाती एका झेंड्याखाली एकत्र - आल्या.
पेशवेकाळात मात्र ब्राह्मणांचा राजकीय व सामाजिक जीवनावर प्रभाव वाढून पुन्हा जातीप्रथेला खतपाणी मिळाले. शेवटचा पेशवा दुसऱ्या बाजीरावच्या काळात तर स्पृश्य-अस्पृश्यतेने उच्च टोक गाठले होते. अस्पृश्यांना गावाच्या बाहेर राहावे लागे, त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. सार्वजनिक ठिकाणी पाणी भरण्यास सण-उत्सवात भाग घेण्यास मनाई होती, त्यांच्या सावलीनेही विटाळ होतो असे समजून अस्पृश्यांना सकाळी व सायंकाळी गावात फिरण्यावर बंदी घातली. इंग्रजांचे साम्राज्य स्थापनेच्या प्रारंभी अस्पृश्य जातीची स्थिती अत्यंत निकृष्ट दर्जाची होती.

२) स्त्रियांचे जीवन : 
                           प्राचीनकाळी कोणत्याही पितृसत्ताक कुटुंबपद्धती असणाऱ्या समाजात मुलगी जन्माला येणे स्वागतार्ह मानीत नसत. अशा कुटुंबात नेहमीच मुलाला महत्त्व अधिक असे. प्राचीन काळातील कितीतरी शतके मुलींना उत्तम शिक्षण दिले जाई. इ.स. च्या तिसऱ्या शतकापर्यंत सोळाव्या वर्षांपर्यंत अविवाहीत राहून मुली शिकत असत. पुरुषांप्रमाणे स्त्रियांना तेव्हा स्वतंत्र, बौद्धीक व आत्मिक जीवन होते. मुलींचे मुलांप्रमाणे उपनयन होत असत. उपनिषदामध्ये गार्गी, वाचवावी, गुलभा, मैत्रेयी, सुपर्थमा, अरुपती इ. विद्वान सिया आढळतात. साधारणतः इ.स. च्या पहिल्या शतकापासून मुलीचे बालविवाह होऊ लागले. ४०या, ५०या शतकापासून मुलींची लगे ११-१२ व्या वर्षी होऊ लागली. मुसलमानी आक्रमणानंतर स्त्रि साक्षरतेचे प्रमाण मी झाले. लढाया, आक्रमणे व बालविवाह यामुळे निरक्षरतेचा प्रसार जोरात होऊ लागला. काही संपर घराण्यातच मुलींच्या साक्षरतेची सोय केली जात असे. हे निरक्षरतेचे प्रमाण इतके वाढले होते की, १९ व्या शतकाच्या सुरुवातीस शंभरात एखादीच सी साक्षर असे.इ.स. पूर्वी पाचव्या शतकापर्यंत प्रौढ विवाहाची चाल रुढ होती. समाजात बालविवाह रूढ झाला आणि सियांच्या कुटुंबाला दर्जा खालावला. बालवयात परगृही आलेल्या मुली गांगरून जात, पुष्कळदा त्यांना कामाचा बोजा पेलवत नसे, त्यांच्या हातून चूका होत व अशा चुकांसाठी स्त्रियांना शिक्षा करण्याचा अधिकार शाखानेच पतीला दिला होता.

इ.सनाच्या दुसऱ्या शतकापासून समाजाच्या मनावरचा विरक्तीचा पगडा वाढत चालला तसतसा विधवेच्या सुखाला विरोध होऊ लागला आणि सहाव्या शतकापासून कलियुगात विधवेचा विवाह पूर्ण निषिद्ध मानला गेला, अकराव्या शतकापासून तर बालविधवेचाही विवाह होईना. ज्यांना सती जाण्याचे धैर्य नव्हते व संन्यस्त, व्रतस्थही राहणे शक्य नव्हते अशा लिया मग समाजातून उठत. विधवांच्या सुखाची नुसती पायमट्टी झाली, इतकी की ८-९ वर्षाची बालविधवा पेशवाईत दीनवाणे लाचार जिणे व्रतस्थपणे, बिनतक्रार, एकेकाळी सुंदर असलेला चेहरा केशवपनाने विद्रुप करून जगू लागली. प्राचीन काळी खिर्याचे पुनर्विवाह होत होते. परंतु धर्मशाखाच्या पुढील टीकाकारांनी अशा विवाहाची संमती काढून घेतली. त्यामुळे घटस्फोट किंवा श्रीच्या बाबतीत विवाहविच्छेद हा शब्द धर्मशास्त्राला किंवा हिंदू समाजाला १९ व्या शतकापर्यंत माहीतच नव्हता.वेदकाळात सतीप्रथा नव्हती. इ.स.च्या ७ व्या शतकापासून ११ व्या शतकापर्यंत उत्तर हिंदुस्थानात विशेषतः काश्मीरमध्ये सतीची चाल अत्यंत लोकप्रिय होती. राजपुतान्यात मृताबरोबर सती जाणाऱ्या स्त्रियांच्या संख्येने उच्चांक गाठला. मुसलमान राज्यकत्यांना सतीची चाल मान्य नव्हती. त्यांनी ती बंद करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला पण हिंदू धर्मात हस्तक्षेप नको अशा विचाराने त्यांनी या बाबतीत प्रत्यक्ष कायदा केला नाही. ब्रिटीश सरकारने १९ व्या शतकाच्या सुरुवातीला सतीची आकडेवारी काढली त्यावेळी बंगालमध्ये सतीची संख्या जास्त असल्याचे आढळून आले इ.स. १८१८ मध्ये बंगालमध्ये जास्तीतजास्त म्हणजे ८३९ खिया सती गेल्या. महाराष्ट्रात मात्र सती जाण्याचे प्रसंग कमी दिसून येतात, इंग्रज सरकारने सामाजिक सुधारणांसाठी काही कायदे केले. १८२९ साली सती बंदीचा कायदा झाला. १८५६ साली विधवा पुनर्विवाहाचा कायदा झाला, १८९१ साली संमती वयाचा व १८२९ साली शारदा अॅक्ट पास झाला. बालविवाहाची पद्धती रूढ असल्याने घराणे, प्रतिष्ठा, पैसा या गोष्टींना विवाह ठरवितांना फार महत्त्व असे पण वधूला काहीही महत्त्व नसे, मुलगी पाहण्याचा कार्यक्रम सहसा होत नसे आणि झालाच तर त्याला महत्त्व नसे.

वयाने जास्त असलेला घोडनवरा आणि बालनवरी यांच्या विवाहात त्या बिचाऱ्या छोट्या बालिकेवर पुष्कळदा मोठा जुलूम होई. पुष्कळदा पुरुषाच्या अनावर कामवासनेच्या होमकुंडात त्याच्या अल्पवयीन सहधर्मचारिणीची आहुती पडे. लहानपणापासून खीला सासरी मरावे पणते घर सोडू नये असे शिकवले होते. त्यामुळे त्या खीचा कितीही छळ झाला तरी ती घर सोडू शकत नसे. कित्येकदा बायकांचे गुपचूप खून फरण्यात येत. शेजान्यांना किंवा नातेवाईकांना हे माहीत असूनही ते गप्प बसत. यावरून सिंयांच्या जीवनाला किती किंमत होती हे दिसून येते. छळ सहन न होणाऱ्या अनेक लिया आत्महत्या करून स्वतःची सुटका करून घेत. पती हाच परमेश्वर या शिकवणूकीचा प्रभाव स्त्रीवर असल्याने ती पतीविरुद्ध किंवा सासरच्या मंडळीविरुद्ध दाद मागत नसे. आदिवासी जमातीत मात्र बालविवाह फारसे रूढ नव्हते. या बहुतेक जमातीतस्त्री-पुरुषांचे एकमेकांशी वागणे मोकळेपणाचे असल्याने मुला-मुलींना निवड करणे फारसे कठीण जात नसे. एखाद्याने लढाई जिंकली म्हणजे त्याला हजारो दासी मिळत. परकीय मुसलमान राजेच हिंदू स्त्रियांना दासी म्हणून वागवीत असे नव्हे तर रजपूत राजे एकमेकांशी लढत तेव्हाही शत्रूच्या स्त्रिया जिंकून त्यांना दासी बनवीत. परकीय मुलखात स्वारी करून तो प्रदेश जिंकणारे सैनिक मुसलमान, रजपूत किंवा मराठे असोत, विजयाच्या उन्मादात स्त्रियांवर अत्याचार करणे ते आपला अधिकार समजत. शिवाजी महाराजांनी आठ लग्ने केली पण परस्त्रीची अभिलाषा हे महापातक मानले. महाराज शत्रूंच्या स्त्रियांनाही आदराने वागवीत. महाराष्ट्रात नंतरच्या काळात रक्षा, उपली, नाटकशाळा, मर्जी अशी वेगवेगळी नावे देऊन स्त्रिया बाळगणे हे शिष्टसंमत मानले जाई.

खंडोबा हे महाराष्ट्राचे दैवत मानले जाते. १९ व्या शतकापर्यंत व नंतरही मुले न होणान्या वहोऊन अल्पवयात जाणाऱ्या मुलांची आई खंडोबाला नवस करी की मला मुल झाल्यास तुला अर्पण करीन, असा नवस करणारे दोन मुले होताच पहिले मुल ते पुरुष असो वा स्त्री असो, देवास अर्पण करीत अशी अर्पण केलेली मुले वाघ्या व मुरळी बनत. शेकडो मुरळी बनलेल्या स्त्रियांना वेश्यावृत्तीकडे वळविले जाई. महाराष्ट्रात या काळात बायकांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणावर होई. या बहुधा अविवाहीत खिया असत व त्या शुद्ध स्त्रिया असत. स्त्रियात हिंदूचा विशेष भरणा असला तरी मुसलमान पोरीही विकत घेत आणि अशा स्त्रियांना कुणाविणी म्हटले जाई. स्त्रियांना संपत्तीतही वाटा मिळत नसे. हा हा फक्त मुलालाच असे. अशा प्रकारे स्त्रियांचे जीवन अत्यंत हलाखीचे बनले होते.

३) धार्मिक अवनती :
                            १९ व्या शतकाच्या प्रारंभीच्या समाज जीवनावर धार्मिक आचार-विचारांचा प्रभाव होता. धर्माचे युद्धाचे स्वरूप नष्ट होऊन व्रतवैकल्ये, कर्मकांड, ब्राह्मणभोजने, दक्षिणाप्रथा, दानधर्म यांना महत्त्व मिळाले. पुरोहित वर्गाने समाजातील आपले स्थान टिकवण्यासाठी मुहूर्त, ज्योतिष, जप, दान, व्रत इत्यादिंवर अधिक भर दिला. खरा हिंदू धर्म विसरला जाऊन स्वार्थावर आधारित मतांना धार्मिक मते म्हणून उसवण्यात आले. व्रतवैकल्ये, नामजप, अनुष्ठाने केल्याने मोक्ष मिळतो. देवता प्रसन्न होतात असा समज निर्माण केला गेला. अगदी लहान लहान कार्यासाठी मुहुर्त पाहणे, अनुष्ठाने करणे हे प्रकार होऊ लागले. दानधर्म, ब्राह्मणभोजने यावर प्रचंड पैसा खर्च होऊ लागला. धर्माच्या नावाखाली अधर्माला महत्त्व मिळत गेले. तंत्रमंत्र, जादूटोणा, भूतपिशाच्च यास महत्त्व मिळाले. शिव, विष्णू, विठोबा, खंडोबा, भवानी यांच्याबरोबर मरीआई, पोशम्मा, वेताळ यासारख्या ग्रामदेवतांना महत्त्व मिळाले. वेदांचे खरे ज्ञान धर्मपंडीतांनी सर्वसामान्य व अशिक्षित जनतेपर्यंत येऊ दिले नाही.धर्मांच्या नावाखाली हिंदू धर्मात अधर्माचे स्तोम माजले, प्रयत्न वादापेक्षा दैववादाचे महत्त्व वाढत गेले. याच काळात महाराष्ट्रात इस्लाम व ख्रिश्चन धर्माचे अस्तित्व होते. हिंदू धर्मातील वाईट प्रथांचा फायदा घेऊन त्यांनी आपला धर्म मोठ्या प्रमाणात वाढवला. राजा राममोहन रॉय, बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी अशा समाज सुधारकांनी धार्मिक प्रबोधनासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. ब्रिटीश शिक्षणाच्या प्रभावातून ब्रिटीशांच्या आचार-विचारातून लोकांना धर्म सुधारण्याची गरज वाटू लागली. त्यातून महाराष्ट्रात धर्मसुधारणा चळवळ सुरू झाली.

४) इंग्रजी शिक्षण व समाजसुधारणेला चालना : 
                                                                अज्ञानी व अडाणी लोकांना नवे विचार, ज्ञान व शिक्षण देण्यासाठी ब्रिटीशांनी पाश्चात्य शिक्षण महाराष्ट्रात सुरू करण्याचे ठरविले. शिक्षण हे समाजसुधारणेचे शस्त्र आहे. त्यामुळे समाजातील अंधश्रद्धा, अस्पृश्यता, सतीची चाल, देवदासी प्रथा इ. अनिष्ट प्रथा नष्ट होऊ शकतील असे वाटून १८१३ च्या सनदी कायद्यात भारतीय लोकांना शिक्षणासाठी एक लाख रुपयाची तरतूद इंग्रजांनी केली. मुंबईत 'दि बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी' स्थापन करण्यात आली. पुण्यात १८१२ मध्ये संस्कृत कॉलेजची स्थापना झाली. यानंतर पूणा कॉलेजचीही स्थापना करण्यात आली. महाराष्ट्रातील आधुनिक इंग्रजी शिक्षणाच्या प्रारंभामुळे समाजसुधारणा व धर्म सुधारणा चळवळीस वेग प्राप्त झाला.

महाराष्ट्राची आर्थिक स्थिती :

एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील महाराष्ट्रातील आर्थिक स्थिती कशी होती? कोणत्या आर्थिक पार्श्वभूमीवर ब्रिटिशांनी महाराष्ट्रात आपली सत्ता प्रस्थापित केली हे समजून घेणे आवश्यक आहे. १९ व्या शतकातील महाराष्ट्रातील आर्थिक जीवनाची काही ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे

१) शिवकालीन आर्थिक स्थिती 
                                     शिवकालात खेडी हा अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा होता. खेडी स्वयंपूर्ण होती. लोकांच्या गरजा खेड्यातून भागविल्या जात. शेती हा खेड्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय होता. शेती हेच उत्पन्नाचे मुख्य साधन होते. शेतीबरोबरच उद्योगधंदे, व्यापारही तेजीत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांकडून जास्तीत जास्त पैसा वसूल करणारी मक्तेदारी व जमीनदारी पद्धत बंद करून रयतवारी पद्धत सुरू केली. शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करून शेतीच्या विकासास हातभार लावला.

२) पेशवेकालीन आर्थिक स्थिती  
                                           पेशवेकालीन जमीन महसूल पद्धतीत बाळाजी बाजीराव, माधवराव, नाना फडणवीसांनी महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणल्या. जमिनीची मोजणी व पाहणी करून शेतसारा आकारला जाई. सरकार शेतकऱ्यांकडून एक तृतीयांश जमीन महसूल गोळा करीत होते. माधवरावांनी कमालधारा 'पद्धती सुरू केली होती. पाटील, देशमुख हे वतनदार महसूल वसुलीचे काम करीत. नगदी पिकांवर जास्त कर आकारला जाई. त्यावेळी बागाईत जमिनीतील एका बिध्याला ६ रुपये, मळी जमिनीतील एका विध्याला ३ रुपये, काळी जमिनीतील एका विध्यास २ रुपये इतकी रकम कमाल पद्धतीने किंवा तनखा पद्धतीने वसूल केली जाई.

३) जमीनधारणेचे प्रकार : 
                                       सरकारकडून शेतकऱ्यांना काही अटींवर जमीन कसण्यासाठी दिली जात असे. या पद्धतीलाच जमीनधारणा असे म्हणतात. १८व्या शतकात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जमिनीची खरेदी-विक्री करणे, गहाण टाकणे इत्यादी अधिकार होते. मराठ्यांच्या काळात जमीनधारणेचे खालील प्रकार अस्तित्वात होते.

अ) शेतीची मालकी असणारा वर्ग किंवा मिरासदार.

ब) मोकाशींना सरकारकडून मोफत जमीन मिळत असे

क) मिरासदारांकडून खंडाने काही जमीन उपरींना मिळत असे.

ड) जहागिरदार आपल्याकडील जमिनी शेतकऱ्यांकडून कसून घेत.

इ) भूमिहीन शेतकरी

मराठेशाहीच्या अखेरच्या काळात महाराष्ट्रात तरफदारी, वतनमिरासी, उपरी हे चार जमीनधारणेचे प्रकार शिल्लक होते. शेवटी मिरासी, उपरी हे दोनच प्रकार अस्तित्वात राहिले. याच काळात महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सावकारांचा उदय झाला. मारवाडी, गुजर, ब्राह्मण लोक सावकारींचा व्यवसाय करीत. उदा. तुळशीबागवाले दीक्षित, पटवर्धन इत्यादी. सावकारीच्या संदर्भात कोणतीही कायदेसंहिता नसल्यामुळे सावकार कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त करीत असत.

४) मराठेकालीन उद्योगधंदे : 
                                 मराठ्यांच्या काळात महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व स्वावलंबी होता. शेती हा मुख्य व्यवसाय असला तरी शेतीवर आधारित अनेक उद्योगधंदे चालत असत. त्यापैकी काही प्रमुख व्यवसाय, उद्योगधंदे पुढीलप्रमाणे.

अ) विणकर व्यवसाय: 
                               पेशवेकाळात विणकर व्यवसाय खूपच भरभराटीला आला होता. पेशव्यांनी या व्यवसायासाठी वेगवेगळ्या भागातून कारागिरांना बोलावून घेतले होते. उदा. निजामाच्या प्रदेशातून मोमीन, उत्तरेकडून खत्रींना बोलावून घेतले होते. महाराष्ट्रीयन लोकांचा पोशाख अत्यंत साधा होता, पुरुष धोतर, पायजमा, अंगरखा, डोक्याला पागोटे वापरत, लिया साड्या, सलवार कमीज, दुपट्टा वापरीत. धोतर सोलापूर, सासवड, सुपे या ठिकाणी तर पागोटे नांदेड, पैठण, जुन्नर, जालना येथे आणि रेशमी कापड पैठण, येवला येथे तयार होत असे. मुंबईत कापड आणि रेशमी कारखाने होते. चिटाचे कापड अंगरखा, झगा, रुमाल, साड्या, टोप्या, पासोड्या, फेटे बनविण्यासाठी वापरीत.चिटाचे उत्पादन नागपूर, सासवड, गंगासागर येथे होत असे.

ब) लाकूड व्यवसाय 
                          लाकडाचा उपयोग शेतीची अवजारे तयार करण्यासाठी, घरे बांधण्यासाठी, जहाज बांधण्यासाठी केला जात असे. लाकडापासून बैलगाड्या, नांगर, कुळव, घोडागाड्या, पालख्या, होड्या तयार केल्या जात. दुमजली घोडागाडीसाठी अहमदनगर प्रसिद्ध होते. त्यासाठी कल्याण व सावल्या घाटातून लाकूड आणले जाई. लहान मुलांसाठी लाकडी खेळणी बनविली जाई. वसईतील ताकूडकामासाठी जव्हारमधील जंगलातून लाकूड मागविले जात असे. त्या काळात लाकूड व्यवसाय खूप प्रगत होता..

क) हस्तिदंत व्यवसाय : 
                             हस्तिदंतापासून खेळणी, कंगवे आणि वस्तू तयार करीत असत. पारशी लोक हस्तिदंताचा व्यवसाय करीत. गाईच्या शिंगापासून दौतशाई ठेवण्याचे स्टैंड, पेट्या, बाहुल्या व इतर शोभेच्या वस्तू बनविल्या जात.

ड) धातूकाम: 
                           तांबे, पितळ, लोखंड या धातूपासून दैनंदिन गरजेच्या वस्तू तयार केल्या जात. लोखंडापासून घोडयाच्या व बैलाच्या पायाला मारावयाची नाल व खिळे तयार केले जात. नागोठणे येथील तांबट कारागीर तोफा तयार करीत. 

इ) सोन्या-चांदीचा व्यवसाय: 
                               पेशवेकाळात सोन्या-चांदीचे दागिने तयार करण्याचा व्यवसाय खूपच विकसित होता. बांगडया, मंगळसूत्र, गळ्यातील हार, नथनी, बाजूबंद इत्यादी दागिने सोन्या- चांदीपासून बनविले जात. सोने, चांदी यांचा उपयोग नाणी पाडण्यासाठीही केला जाई.

ई.) चर्मोद्योग : 
                           प्रत्येक खेड्यात चर्मकार राहात असते. जनावरांच्या चामड्यापासून जोडे (पायातल्या चहाणा) तयार करणे, मोट व शेतीस उपयुक्त इतर वस्तू तयार करणे हा उद्योग चर्मकार करीत.

) मीठ उत्पादन 
                         मराठ्यांच्या काळात मीठाचा उद्योग कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात भरभराटीस आला. पोर्तुगीजांच्या प्रदेशातून स्वराज्यात येणान्या मीठावर जास्त कर आकारला जाई. म्हणून स्वराज्यातील मीठ उत्पादनास प्रोत्साहन दिले गेले.

) साखर उत्पादन 
                                ऊसाच्या पिकावर साखरेचे उत्पादन अवलंबून होते. पांढरी साखर, कच्ची साखर खडीसाखर व तपकिरी साखर असे साखरेचे प्रकार होते.

(५) बाजारपेठांवरील नियंत्रण : 
                     बाजारपेठेवर नियंत्रण ठेवण्याचे काम शेटे, महाजन, आवटे, कमाविसदार, कोतवाल यासारखे अधिकारी करीत. बाजारपेठेतून माल चोरीस जाणार नाही, व्यापारी लोक वस्तूची कृत्रिम टंचाई निर्माण करणार नाहीत, भाववाढ होणार नाही यासाठी हे अधिकारी जागरूक असत. आवटे वजन- मापे तपासण्याचे, कोतवाल वस्तूचे भाव ठरवून देण्याचे काम करीत. अशा पद्धतीने बाजारपेठांचे व्यवस्थापन केले जात असे.

६)ब्रिटिशकालीन नवीन आर्थिक नीती 
                             इ.स. १८१८ मध्ये मराठ्यांचा पराभव झाल्यानंतर महाराष्ट्रात ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाली. ब्रिटिशांनी शेती, व्यापार, उद्योगधंदे या क्षेत्रात सुधारणा घडवून आणल्या. मराठेकालीन जमीन महसूल पद्धती अतिशय उपयुक्त आहे, त्यात बदल करू नये असे मत पुण्याचा कलेक्टर रॉबर्टसन, धारवाडचा कलेक्टर चॅपलीन यांचे होते. त्यांनी मुंबईचा गव्हर्नर एल्फिन्स्टनकडे स्थानिक स्वराज्य संस्थेचा विकास करण्याची मागणी केली. त्यामुळे खेड्यातील शेतकऱ्यांना ब्रिटिशांविषयी आस्था वाटेल असे त्यांना वाटत होते. परंतु त्यामुळे कंपनीला धोका पोहोचणार होता म्हणून वापराला प्रो. रविंद्र जी. मोअर यांनी विरोध दर्शविला..

७) एलफिन्स्टनची महसूल पद्धती 
                         मुंबईचा गव्हर्नर एलफिन्स्टने जमीन महसूलच्या कायमधारा पद्धतीस विरोध केला आणि मौजेवारी व रयतवारी पद्धती सुरू केली. या पद्धतीत त्याने खालीलप्रमाणे सुधारणा केल्या.

१) लिलावाची पद्धत पूर्णपणे बंद केली.

२) चौथाई व सरदेशमुखी पुन्हा लागू केली.

३) महसूल वसूलीचे काम पाटील, कुलकर्णी यांचेवर सोपविली.

४) महसूलाचा दर १० वर्षांच्या सरासरीवरून ठरविला.

५) प्रत्यक्ष लागवडीखाली असणाऱ्या जमीनीवरच कर आकारला.

६) जुल्मी कर पद्धती बंद केल्या.

७) मामलेदार, कलेक्टर यांनी शेतकल्यावर नवीन कर बसवू नयेत असे स्पष्टपणे बजावले.

८) पडीक जमीन लागवडीखाली आणण्यासाठी कलेक्टरने शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य व सवलती द्याव्यात.

९) बॉन्ड लिहूनच शेतकन्यांना करात सवलती द्याव्यात. माहिती खोटी निघाल्यास दुप्पट कर वसूल कराया.

अशा रीतीने एलफिन्सन्टनने जमीन महसूल पद्धतीत महत्त्वपूर्ण सुधारणा करून शेती व्यवसायात महत्त्वपूर्ण योगदान दिले. शेती व्यवसायास प्रोत्साहन देऊन शेती व्यवसायाचा पाया घातला.

Comments

Popular posts from this blog

टी वाय बी ए सेमिस्टर६ इतिहास पेपर नंबर 6

टी वाय बी ए सेमिस्टर६ इतिहास पेपर नंबर ४ मध्ययुगीन भारताचा इतिहास मुघल काळ (१५२६-१७०७) VIMP Notes