टी वाय बी ए सेमिस्टर६ इतिहास पेपर नंबर ४ मध्ययुगीन भारताचा इतिहास मुघल काळ (१५२६-१७०७) VIMP Notes

  बाबराच्या आक्रमणावेळची परिस्थिती

अ) भारतातील राजकीय परिस्थितीः

१) दिल्ली:

महमंद घोरीने पृथ्वीराज चव्हाणचा १९९२ तराईनच्या युद्धात पराभव करून, दिल्लीची सत्ता मुसलमानांनी हाती घेतली. अल्लाउद्दीन खिलजी व महंमद तघलकाच्या काळात सर्व हिंदुस्थान सत्ता निर्माण झाली. परंतु नंतर सुलतानशाहीला उतरती कळा लागली. तैमूरलंगाने आक्रमण करून भयानक हत्याकांड व लुटालुट केली. खिजखान सय्यदने १४१३ दिल्लीची सत्ता ताब्यात घेतली. शेवटी सय्यद सुलतान दिल्ली सोडून जाताना बहलोल लोदीने गादी मिळवली. त्याने पंजाब, जौनपुर, बुंदेलखंड, पश्चिम, बिहार, इ. भाग ताब्यात घेतले. त्याचा मुलगा सिकदरखानाने राज्यात स्थैर्य प्राप्त केले. त्यानंतर इब्राहीम खान गादीवर आला. जौनपूरच्या राज्यावरून इब्राहीमखान व भाऊ जलालखान यांच्यात वाद होऊन, जलालखानाला ठार मारले. इब्राहीमखान संशयी, शंकेखोर स्वभावाचा होता. त्याने जलालखानाला मदत करणाऱ्या सरदारांना कैदेत टाकले व ठार मारले. सत्ता टिकवण्यासाठी रक्तपात, जुलुम, हत्या करत असे. पंजाबचा राज्यपाल दौलतखान यांने दिल्लीत भेटीसाठी यावे असा हुकूम इब्राहिमखानाने काढला. पण दौलतखानाने आपला मुलगा दिलावरखान याला पाठवले. त्यामुळे इब्राहिमखान रागवला व दिलावरखानास शिक्षा दिली. म्हणून दौलतखानाने बाबरला हिंदुस्थानावर स्वारी करण्याचे निमंत्रण दिले.

२) बंगालः
१२ व्या शतकात महंमद खिलजीने बंगालचा प्रदेश जिंकला तेथे दिल्ली सुलतानची सत्ता प्रस्थापित झाली. खिलजीनंतर अधिकारी स्वतंत्रपणे वागू लागले पण बलबनाने दिल्लीची सत्ता पुन्हा बंगालवर निर्माण केली. १३३९ मध्ये अल्लाउद्दीन अलीशहाने स्वतःस बंगालचा शासक म्हणून घोषीत केले, त्याला दिल्लीपती फिरोजशहा तुघलकने यांनी मान्यता दिली. बंगाल प्रांत स्वतंत्र्य झाला. १४९३-१५१८ पर्यं अल्लाउद्दीन हुसेनशहां गादीवर होता. १५१८ मध्ये नासिरूद्दीन नसरतशहा बंगालच्या गादीवर आला. त्याला दिल्लीच्या राजकारणात रूची नसल्याने बावरच्या आक्रमणाच्या वेळी इब्राहिमखान लोदीला मदत केली नाही.

३) काश्मीर:
काश्मीर हे हिंदूचे राज्य होते, राजा रामचंद्र याला त्याचा मंत्री शाह मिर्झाने ठार करून १३३९ मध्ये मोगल सत्तेचा पाया घातला. १४२० ते ७० या काळात गादीवर आला. जनुला अबादीनेने मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या. हिंदूना बऱ्याच सवलती दिल्या, काश्मीर सोडून गेलेल्या हिंदूना परत बोलवले, नवीन मंदिरे बांधली, जिझिया कर माफ अनेक संस्कृत ग्रंथाचे फारसी भाषेत रूपांतर केले, अबादीन मरण पावल्यानंतर काश्मीरमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे दिल्लीच्या राजकारणात प्रवेश नाही.

४) गुजराथः
तैमूरलंगाच्या आक्रमणानंतर गुजरातचा सुभेदार झापूरखान याने दिल्लीचा संबंध तोडून मुजराथ स्वतंत्र राज्य बनवले. तो मुळचा रजपूत राजा पण धमांतराने मुस्लीम झालेला होता. त्याने १४०१ आपला मुलगा तातरखान याला गुजराथचा शासक बनवला १४११- ८१ या काळात महमुदशहा गादीवर होता. तर १४५१-१५११ या काळात महमुद बेगड़ा हा सत्ताधीश बनला त्याने चंपानेर, जुनागड व कच्छ ही राज्य जिंकून विस्तार केला. गुजरात मधील परदेशी व्यापार बंद पडला. त्यामुळे राजकीय व आर्थिक गरज ओळखून, पोर्तुगीजांचा बंदोबस्त करण्यासाठी बेगडाने तुर्कीराजा व कालिकतचा हिंदु राजा याच्याशी संबंध तोडले. त्याने १५०७ मध्ये पोर्तुगीजांचा पराभव केला. पोर्तुगीजांनी १५०९ मध्ये बेगडा यांचा पराभव केला. बेगडानंतर १५११ ते २६ या काळात मुझफरशहा सत्ताधीश झाला. त्याला अनेक संघर्ष करावा लागला. १५२६ मध्ये बहादुरशहा हा गुजराथचा सत्ताधीश झाला.

५) माळवाः
मध्य भारतात माळवा, गुजराथ, मेवाड या तीन राजकीय सत्तामध्ये संघर्ष होता, कारण मध्य भारतावर वर्चस्व निर्माण करावयाचे होते. तैमुरलंगाच्या आक्रमणानंतर दिलावरखान घोरीने माळव्यात सत्ता स्वतंत्र निर्माण केली, दिलावरखानाचा प्रधान महमुदबोरी । महमदखान यांनी १४३५ खिलजी घराण्याची सत्ता सुरू केली. त्याने गुजराथचे सुलतान, राजपुतराजे, बहामनी राजे यांच्याशी संघर्ष करून सत्ता स्थिर केली, त्याच्यानंतर गाजीउद्दीन व नसिरुद्दीन हे दोघे शातक होऊन गेले. बाबरच्या स्वारीच्या वेळी गुजराथ शासक नसिरुद्दीनचा मुलगा महमुद दुसरा १५१०-३१ या काळात सत्तेवर होता. युद्धात पराभूत झाल्याने राणासंगाने त्याला चितोडमध्ये कैदेत ठेवले, सुटल्यानंतर पुन्हा शासक बनला.

६) खानदेशः
बहामनी राज्याचा सुलतान मुहंमद दुसरा याच्या विरुद्ध १३६५ मध्ये बंड करून मलिक अहमद याने स्वतंत्र खानदेश राज्याची स्थापना केली. अहमद व त्याचे वंशज स्वतःला खान म्हणत असल्याने खानदेश नाव पडले. हा तापी नदीच्या खोन्याचा प्रवेश होय. १३९९ मध्ये मलिक अहमदचा मृत्यु झाल्यानंतर दोन मुलांत सघर्ष सुरू झाला. नासीर हसन यांच्या संघर्षांत नासीरला गादी मिळाली. त्याच्यानतर नासीर आदिलखान १४४१ पर्यंत, मुलगाआदिलखान आला.इ.स १५०१  पर्यंत गादीवर बाबरच्या आक्रमणावेळी मिर्झा मोहम्मद हा सत्ताधीश होता गुजरात संघर्षात पराभव झाल्याने खानदेशावर गुजरातचे वर्चस्व प्राप्त झाले आणि खानदेश मांडलिक बनले.

७) सिंध व मुलतानः
८ व्या शतकात महमद बिन कासिमने प्रथम सिध प्रांतात सत्ता स्थापन केली. महंमद गझनीने ११ व्या शतकात सिंध जिंकून घेतले. गझनीच्या वंशजांना पराभूत करून सुमरा जातीच्या राजपूतांनी सिध जिंकून घेतले. १२ व्या शतकामध्ये महंमद घोरीचे सिंधवर कब्जा मिळवून पुन्हा मुसलमानाची सत्ता निर्माण केली. याच वेळी समरा राजपूतांचे महत्व कमी होऊन, सामान राजपूत्ताचे महत्त्व वाढले. त्यामुळे सिधचे शासक समान राजपूत बनले यांनी इस्लामी धर्माचा स्वीकार करून स्वतःला 'जाम' म्हणत असे. महमद तघलकाच्या काळात दिल्लीच्या नियंत्रणातून सिंध स्वतंत्र्य झाले. त्याच्या मृत्युनंतर जाम खैरूद्दीनने फिरोजशहा तघलकाचे वर्चस्व झुगारून स्वतंत्र्य सिंधची स्थापना केली. यावेळी बाबराकडून कदाहारचा राजा शाहम अर्जुन पराभूत झाल्याने त्याने सिधचा आश्रय घेतला.

८) बहामनी राज्यः 
महंमद तुघलकच्या जुलमी राजवटी विरूद्ध व चुकीच्या धोरणामुळे अनेक उठाव झाले, त्यापैकी तुर्की सस्दार जफरखान उर्फ हसन गंगू याने १३४७ मध्ये गुलबर्गा येथे स्वतंत्र बहामनी राज्याची स्थापना केली. १३५८ पर्यंत त्याने कारभार करून राज्याच्या सिमा पश्चिमेकडील समुद्रापर्यंत, पूर्वेकडील मोनगर, उत्तरेकडे पैनगंगा तर दक्षिणेकडे कृष्णा नदीपर्यंत विस्तार वाढवला. १३८१ पर्यंत राज्याचा दिवाण महंमद गवान होता, तोपर्यंत वैभव होते. नंतर हासाचा प्रारंभ होऊन १४९० मध्ये राज्यात विभाजन झाले. अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्‌याची कुतुबशाही, वन्हाडची इमादशाही, बिदरची बरीदशाही यांच्यात सत्ता संघर्ष निर्माण झाले. महंमद शाह बहामनी राज्याचे असताना विभाजन झाले. एकमेकांशी संघर्ष करीत असल्याने उत्तरेच्या राजकारणात त्याचे महत्त्व शून्य होते.

९) पंजाब:
पजाब प्रांतावर दिल्लीची सत्ता नाममात्र होती, पंजाबचा राज्यपाल दौलतखान लोदी याचे संबंध सलोख्याचे नव्हते, दौलतखान स्वतंत्र कारभार करत असल्याने, स्वतंत्र राज्याचा दर्जा प्राप्त झाला, दौलतखानला कठोर शिक्षा देण्यासाठी त्याला दिल्लीत बोलवले. त्याने आपला मुलगा दिलावरखानास पाठवले. इब्राहिमने त्याला शत्रू या नाल्याने वागवले. त्यामुळे दौलतखानाने इब्राहिमखानाच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी दिल्लीचे संबंध तोडून, बाबरला भारतावर आक्रमण करण्यास बोलिवले.

(१०) जोनपुर:
फिरोजशहा तघलकने चुलत भावाच्या आठवणीसाठी जोनपूर शहर बसवले. मलीक सरबर हा वजीर बनला. त्याने दूरावा, कोल, कनीज येथील बंड मोडून ते राज्यात जोडले. तैमूरलंगच्या आक्रमणाचा फायदा घेऊन, मलीक सरबर  याने जोनपुर येथे स्वतंत्र राज्य स्थापन केले

११) मेवाडः
इ.स. ५३० मध्ये गुहिल नावाच्या व्यक्तीने मेवाड राज्याची स्थापना केली. राजस्थानातील सामर्थ्यशाली, प्रभावी व विशाल राज्य असून चित्तोड ही त्याची राजधानी होती. राणा समरसिंहने मेवाड राज्याचा विस्तार केला. राणा रतनसिंह राजा असताना अल्लाउद्दीन खिल्लजीने आक्रमण करून जिंकले. त्यावर मालेदव चौहान कारभारी नेमला. परंतु पुढे पुन्हा सोदिया (गुहिल) वंशातील सत्तीशीध बनला. १४३३-६४ या काळात राणा कुंभ हा सत्ताधिश झाला, त्याने माळव्याचा राजा महंमद खिलजीस पराभूत करून कैद केले. या विजयाप्रित्यर्थ चित्तोड येथे मोठा जयस्तंभ उभारला. त्याच प्रमाणे नागौर व गुजरातच्या सुलतानाचा पराभव केला. राणा कुंभ विद्धवान असून वेद, स्मृती, राजनिती, गणित, व्याकरण, तर्कशास्त्र यात रूची होती. तो स्वतः कलावंत असल्याने त्याने कलाकारांना आश्रय दिला होता. १५०८ मध्ये राणासंग ऊर्फ राजा संग्रामसिंह मेवाडचा शासक बनला. दिल्ली सुलतानाची भिती नव्हती. उलट त्याने गुजरातच्या नसिरुद्दीनला पराभूत केले. माळवा जिंकून घेतला. तो महत्त्वाकांक्षी असून राजनितीज्ञ नव्हता. त्यामुळे जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था केली नाही.

१२) विजयनगरचे हिंदू साम्राज्यः
महंमद तघलकचे नियंत्रण दूरच्या प्रदेशावर नसल्याने बहमनी व विजयनगरचे राज्य स्वतंत्र झाले. संगम नावाच्या हिंदू सरदाराच्या मुलानी हरिहर व बुक्क यांनी विजयनगरचे राज्य १३३६ मध्ये स्थापन केले. तुंगभद्रा नदीध्या दक्षिण तीरावर राज्य उभारून मुस्लिम सत्तेला शह देण्याचा प्रयत्न केला. १५०९-३० या काळात तुल्य घराण्यातील कृष्णदेवराय हा पराक्रमी सत्ताधीश होता. राज्याचा विस्तार वाढवला. १५२९ मध्ये मरण पावला, यांच्या काळात आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय प्रगती मोठ्या प्रमाणात झाली होती. दक्षिणेतील मुस्लिम सत्तेच्या विस्ताराला रोखण्याचा प्रयत्न केला.

ब) सामाजिक व सांस्कृतिक परिस्थितीः
सुलतानशाहीच्या प्रारंभीपासून तुघलक घराण्यापर्यंत हिंदू-मुसलमान यांच्यात परस्परचे संबंध होते. मुसलमान दिर्घ काळ भारतात राहिल्याने हिंदूशी सलोख्याचे संबंध निर्माण झाले. त्यामध्ये काश्मीरचा राजा जनुल अबदीनने सहिष्णु धोरण स्वीकारले, त्याने हिंदूना समतेने व न्यायाने वागवले. बंगालचा अल्लाउद्दीन हुसेन शाह व त्याचा मुलगा नसरतशाह यानी बंगाली भाषेला व साहित्याला राजश्रय देऊन संरक्षण केले,
हिंदू मुसलमानांना जवळ आणणारा भक्ती मार्ग होय. भक्ती मार्गाने ऐक्य निर्माण केले, संत कबीर व गुरू नानक यांना हिंदू-मुसलमान हे दोन धर्म एकाच ध्येयाने जाणाऱ्या दोन वाटा आहेत असे प्रतिपादन केले. साहित्य क्षेत्रात सहकार्य मिळाले. हिंदू लोकांची भाषा त्याची व्यावहारिक भाषा याच्या माध्यमातून विचाराचा प्रसार केला. हिंदी, मराठी, बंगाली, गुजरात, राजस्थान भाषेत प्रचंड साहित्य निर्माण झाले, बंगालचा शासक हुसैन शहाच्या प्रेरणेने रूपगोस्वामी नावाच्या संस्कृत पंडीताने विदब्ध माधव व ललित माधव यासारखे साहित्य निर्माण केले.
क) आर्थिक परिस्थितीः

अफगाणांनी जरी अनेक ठिकाणी लुट केली, तरी, ते भारतातच राहिल्याने ती संपती बाहेर गेली नाही. त्यामुळे राजा, अमीर उमराव यांच्याजवळ मोठ्या प्रमाणात सोने, रूपे याचा साठा असल्याचे दिसते, दिल्ली, आग्रा, ग्वाल्हेर येथे बाबरांनी लुट केली. त्यावरून त्याला संपत्तीची माहिती मिळाली होती. संपूर्ण देश कृषीप्रधान होता. परदेशाशी व्यापार चालत. हवामानही चांगले होते. हे सर्व वैभव ऐकून बाबराने भारतावर स्वारी करण्याचा निर्णय घेतला.

Comments

Popular posts from this blog

टी वाय बी ए सेमिस्टर६ इतिहास पेपर नंबर 6