वस्तु संग्रहालयशास्त्र
भारतामध्ये वस्तुसंग्रहालयाचे स्थान अत्यंत मोलाचे आहे. कारण भारताच्या प्राचीन कलासंस्कृतीचा वारसा जतन करुन ठेवण्याचे काम वस्तुसंग्रहालये करतात. एका पिढीपासून दुसऱ्या पिढीला हा बहुमोल ठेवा व त्याचे ज्ञानप्रसाराचे कार्य वस्तुसंग्रहालये करतात. यामुळेच देशांमध्ये सांस्कृतिक एकता व एकात्मता टिकून राहते. भारतासारखा देश जो विविधतेने नटलेला आहे. त्यामध्ये आपणांस भाषिक, धार्मिक, प्रांतिक, सांस्कृतिक विविधता दिसून येते. तरीसुद्धा या विविधतेमध्ये सुद्धा वस्तुसंग्रहालयामुळेच एकता टिकून राहिली आहे. तीचे संगोपन, संवर्धन व जोपासन करण्याचे श्रेय वस्तुसंग्रहालयानांच द्यावे लागेल. म्हणूनच 'डॉ. सत्य प्रकाश वस्तुसंग्रहालये' ही सार्वजनिक संस्था आहे असे म्हणतात.
वस्तु संग्रहालये ही लोकशिक्षणाची महत्त्वाची केंद्रे मानली जातात. भारतासारख्या लोकशाही राष्ट्रामध्ये वस्तुसंग्रहालये खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. वस्तुसंग्रहालयाचे विविध प्रकारे वर्गिकरण करता येते. या वस्तुसंग्रहालयाची काळजी व निगा घेण्याचे काम वस्तुसंग्रहालयातील अभिरक्षक घेतात. म्हणूनच अभिरक्षकांची जबाबदारी व त्यांचे संग्रहालयातील स्थान खूप महत्त्वाचे आहे.
७.२ वस्तुसंग्रहालयाचा अर्थ
वस्तुसंग्रहालये म्हणजे राष्ट्रीय वारसा एकत्र करुन त्याची जपणूक करणारी संस्था होय. वस्तुसंग्रहालयास इंग्रजीमध्ये म्युझियम (श्लेन) असे म्हणतात, म्युझियम हा शब्द ग्रीक भाषेतून आला आहे. म्युझियम या शब्दाची व्युत्पत्ती मोझेन (स्वह) या ग्रीकशब्दातून झाली आहे. प्राचीन काळात ग्रीसमध्ये म्युजेस या ग्रीकांच्या विद्या व कलांच्या देवता होत्या. म्युजेस देवतांची मंदिरे ही मोझेन या नावाने ओळखली जात. ग्रीकांच्या परंपरेनुसार त्याकाळी धर्मसंस्था आणि शैक्षणिक संस्था यांची सांगड घालण्यात येत असे. त्यामुळे ही मंदिरे सर्व विद्या व कलांचे स्फूर्तीस्थान बनले. या मंदिरातून अनेक कलावस्तुंचे जतन केले जाई.
वस्तुसंग्रहालयाचे व्यवस्थापन, संकलन, निगा, कायदे इत्यादीबद्दल माहिती देणारे शास्त्र म्हणजे वस्तुसंग्रहालय शास्र होय, या शास्त्रात कला, संस्कृती, विज्ञान, स्थापत्य, संगीत या शाखांचा समावेश होतो, एखाद्या देशात प्राचीन काळापासून अस्तापर्यंत जी निरनिराळी राज्ये होवून गेली त्यांच्या दृश्य स्वरुपातील खुणा संकलीत करणे, कलात्मक वस्तुंचा दर्जा देवून मूल्य ठरविणे, इत्यादींची माहिती या शास्त्रात महत्त्वाची आहे.
७.३ वस्तुसंग्रहालयाच्या व्याख्या
वस्तुसंग्रहालयाची व्याख्या अनेक तज्ञांनी केली आहे. राष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा जतन करुन ठेवण्याची जागा म्हणजे वस्तुसंग्रहालय होय." जी संस्था आपल्या भावी पिढ्यांसाठी कलावस्तूंचा संग्रह जतन करुन ठेवते त्याचप्रमाणे लोकांचे मनोरंजन करुन त्याचवेळी लोकशिक्षण ही करते ती संस्था म्हणजे वस्तुसंग्रहालय होय." अशा प्रकारे वस्तुसंग्रहालयाची व्याख्या करता येईल. या व्याख्येनुसार वस्तुसंग्रहालय हे केवळ कलात्मक वस्तू जतन करणारी संस्था नसून ती प्रबोधन आणि लोकशिक्षण करणारी संस्था आहे.
वस्तुसंग्रहालयाची व्याख्या अनेक तज्ञांनी व संस्थांनी चांगल्या प्रकारे केल्या आहेत. त्यापैकी काही पुढील प्रमाणे :-
१) मारखंम यांच्या मते "वस्तुसंग्रहालय ही कोणत्याही समाजाला सेवा देणारी संस्था असून, या सेवांची तीन प्रकारे विभागणी करता येईल.
१) वस्तुंची जमवाजमव आणि त्यांचे जतन.
२) त्यावर यथार्थ भाष्य करणे (त्यांचा अन्वयार्थ लावणे).
३) शैक्षणिक सेवा.
२) जॉन थॉमसन यांच्या मते आम जनतेला सदैव खुली असलेली व जनतेच्या सेवेसाठी आणि विकासासाठी, जी केवळ नफा मिळवण्यासाठी उभारलेली नाही, अशी कायमस्वरुपी संस्था कार्यरत असते. ती संस्था म्हणजे वस्तुसंग्रहालय होय."
३) वस्तुसंग्रहालयाची लोकप्रिय व्याख्या युनेस्को (UNESCO - United Nations Educational Scientific & Cultural Organization) संयुक्त राष्ट्रासंघटनेच्या शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटनेने केली आहे. ती व्याख्या पुढीलप्रमाणे, "सर्वसाधारण जनतेच्या हितसंवर्धनासाठी, अभ्यासासाठी कलावस्तूंचे जतन करुन ठेवण्यासाठी कायमस्वरुपी यंत्रणा, येथे विविध कलात्मक वस्तू, शास्त्रीय व तंत्रज्ञानविषयक वस्तुंचा संचय करणारी संस्था ज्यात वनस्पती, प्राणी संग्रहालय, मत्स्यालय इत्यादींचा समावेश होतो, तसेच जनतेला शिक्षण व आनंद देणारी वस्तूंचे प्रदर्शन करणारी संस्था म्हणजे वस्तुसंग्रहालय होय."
वरील व्याख्या आधुनिक वस्तुसंग्रहालयाची भूमिका स्पष्ट करतात. वस्तुसंग्रहालये
म्हणजे केवळ शोकेस नव्हे तर त्यातील वस्तुंचा वर्तमानाशी संबंध प्रस्थिपित होण्यासाठी वस्तुंचा अभ्यास करुन त्या माहितीचा वापर प्रबोधन व लोकशिक्षणासाठी करणे आवश्यक असते म्हणूनच आधुनिक काळात वस्तुसंग्रहालयाची भूमिका महत्त्वाची मानली जाते.
७.४ भारतातील वस्तुसंग्रहालय चळवळीचा इतिहास
वस्तुसंग्रहालयाच्या चळवळीची सुरुवात सर्वप्रथम युरोपमध्ये झाली. १५ व्या शतकापासून प्राचीन ग्रीक व रोमन संस्कृतीच्या विविध अंगाची त्यामध्ये प्रामुख्याने कला, साहित्य, स्थापत्य, विज्ञान व संस्कृतीच्या नव्याने अभ्यासांची सुरुवात झाली. या काळास प्रबोधन म्हटले गेले. याच काळात वस्तुसंग्रहालयाची निर्मिती मोठ्या प्रमाणावर करण्यात आली. या वस्तुसंग्रहालयात श्रीमंत कार्यक्षम व्यक्ती व संस्था प्राचीन व कलात्मक वस्तू जमा करू लागल्या त्यास गॅलरी, कॅबीनेट व स्क्रीटीओ अशा नावाने संबोधले जावू लागले. व पुढे याचे रुपांतर 'म्युझियम' मध्ये झाले. अशाप्रकारे वस्तुसंग्रहालय चळवळीचा प्रसार जगातील इतर सर्व देशांमध्ये झाला.
भारतामध्ये वस्तुसंग्रहालयाच्या चळवळीची सुरुवात शास्त्रशुद्धपद्धतीने ब्रिटिश कालखंडात झाली. भारतात जेव्हापासून उत्खननाला सुरूवात झाली तेव्हापासूनच म्यूझियमची सुरुवात झाली असे म्हणता येईल. कारण भारतातील वस्तुसंग्रहालय चळवळीचा पाया खऱ्या अर्थाने ब्रिटिशांनी घातला त्यांना भारतातील प्राचीन वास्तुंचे अवशेष मंदिरे, कोरीव लेख, नाणी, लेणी कला चित्रे स्थापत्य साहित्य आणि
शिल्पाकृतीविषयी मोठे कुतुहल होते. त्यांनी वास्तुंचा अभ्यास करण्यास सुरुवात केली व त्यांनीच पुढे १८१४ मध्ये कलकत्ता येथे पहिले म्युझियम बांधले. प्राचीन भारतीय संस्कृतीच्या अवशेषांचा पद्धतशीर अभ्यास करण्यासाठी व संपूर्ण भारतातून कलाकृती जमवून त्यांचे जतन करण्यासाठी या म्युझियमचा उपयोग झाला.
आधुनिक काळात वस्तुसंग्रहालाच्या चळवळीची सुरुवात मानली गेली असली तरी भारतामध्ये याची सुरुवात प्राचीन काळी झालेली दिसून येते. याचे विविध पुरावे भारतीय साहित्यामध्ये आढळतात प्राचीन भारतीय वाङ्मयात चित्रशाळा म्हणजे चित्रांचे प्रदर्शन असलेला दालन असा अनेक वेळा उल्लेख आलेला आहे. परंतु या चित्रदालनाविषयी त्यांचे स्वरूप, त्यांची व्याप्ती या संबंधी फारच थोडी माहिती आपणास मिळते. तसेच बुद्धांच्या पवित्र अवशेषांवर अनेक स्तुप भारतात अनेक ठिकाणी उभारले गेले. याची दालने बौद्ध वाङ्मयात सापडतात. उदा. सांची, बुद्धगया, सारनाथ, अमरावती इत्यादी ठिकाणी स्तुपावर अनेक मूर्ती कोरलेल्या आहेत तसेच त्यांवर आपणांस अनेकवेळा शिलालेख सुद्धा आढळून आलेले आहेत. तेव्हा कदाचित हीच भारतीय वस्तुसंग्रहालयाची प्राथमिक अवस्था आहे असे आपल्याला म्हणता येईल. म्हणूनच वस्तुसंग्रहालयाई 126/315 शतकात युरोपमध्ये झाली असली तरी खऱ्या अर्थाने वस्तुसंग्र भारतातच झाली असे आपल्याला म्हणता येईल.
सर्वात प्राचीन संग्रहालये म्हणजे चित्रशाळा व मंदिरे होत. कारण प्राचीन काळी राजे उत्कृष्ट चित्रकाराच्या आयोजित करत त्यात प्रसिद्ध चित्रकार आपापली चित्रे राजवाड्यातील दालनात आणून लावत. शिल्पकारदेखील आपला कलाकृती, शिल्पे दरबारात सादर करीत म्हणूनच ही दालने चित्रशाळा प्राचीन काळातील वस्तुसंग्रहालये मानली जातात.
मध्ययुगीन भारतातसुद्धा हीच परंपरा पुढे चालू राहिली. तत्कालिन शखे, शिकारीची आयुधे, पोषाख, दागदागिने, अलंकार, खंजीर, तलवारी, बंदुका इत्यादी गोष्टी निरनिराळ्या राजांच्या वैयक्तीक संग्रहालयात आपले वैभव व शौर्य दर्शविण्यासाठी ठेवत असत. पुढे ब्रिटिशकाळात म्युझियम निर्माण होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरु झाली.
इंग्रजांनी भारतीय वस्तुसंग्रहालयाचा पद्धतशीर अभ्यास सुरु केला व त्याचे सर्व श्रेय सर विल्मस जोन्स व नार्थेनियल वॉलिच यांना द्यावे लागेल. त्यांनी वस्तुसंग्रहालयाची भारतात सुरुवात केली व या शास्त्राचा विकास केला. म्हणूनच त्यांना भारतीय संग्रहालय चळवळीचे जनक मानले जाते. पुढे जाऊन या शाखेचा विकास इतर त्याच्या सहकान्यांनी केला व ही प्रगती स्वातंत्र्योत्तर काळामध्येही झाली. म्हणूनच भारतीय वस्तुसंग्रहलायाच्या चळवळीचा इतिहास आपणांस पाच विविध कालखंडात करता येईल. ती पुढीलप्रमाणे :
अ) ईस्ट इंडिया कंपनीच्या कारकीर्दीतील वस्तुसंग्रहालये (१७८४ ते १८५७) :
ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाल्यानंतर युरोपियन लोक भारतात आले. त्यांना भारतातील मंदिरे, लेणी, कला व स्थापत्य या बद्दल प्रचंड कुतूहल होते म्हणून त्यांनी भारतीय संस्कृतीमध्ये रस घेऊन भारताच्या संस्कृतीच्या विविध अंगांचा पद्धतशीर अभ्यास करण्यास सुरुवात केली. भारताच्या सांस्कृतिक वैभवाचा अभ्यास करण्यासाठी तत्कालीन सुप्रीम कोर्टाचे एक न्यायाधीश सर विल्यम जोन्स यांनी कलकत्ता येथे १५ जाने. १७८४ मध्ये 'एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगाल' ची स्थापना केली. 'आशियाची विविध देशांच्या इतिहासाच्या प्राचीन अवशेषांचा, कलांचा, शाखांचा व वाङ्मयाचा अभ्यास व संशोधन करणे हा सोसायटीचा उद्देश होता. या सोसायटीतील सदस्यांनी भारताच्या संस्कृतीशी निगडीत असणाऱ्या विविध कलात्मक वस्तु जमा केल्या. परंतु या जमा केलेल्या वस्तुंचे जतन करुन ठेवण्यासाठी त्यांच्याकडे चांगली जागा नव्हती म्हणून त्यांना जागेची गरज भासू लागली. ही गरज भरून काढण्यासाठी एशियाटिक सोसायटीने कलकत्ता येथे आपले पहिले वस्तुसंग्रहालय इ.स. १८१४ मध्ये संग्रहालयाचे दोन प्रमुख विभाग होते.
१) पुराणवस्तू, मानववंशशास्त्र व तंत्रज्ञानविभाग
२) भूशास्त्र व प्राणीशास्त्र विभाग
या सोसायटीने सुरुवातीस किरकोळ स्वरुपाची कला व पुराणवस्तू यांचे पुरावे एकत्र करण्याच्या उद्देशाने काम केले. सुरुवातीस हे काम मंद गतीने चालू होते. तसेच भारतातील लोकसुद्धा आपल्या भूतकाळातील वस्तुंचे जतन करण्यास उत्सुक नव्हते. तत्कालिन शासनाने सुद्धा संग्रहालयाच्या विकासासाठी भरीव मदत केली नाही. परिणामी संग्रहालयाची वाढ जलद गतीने झाली नाही. विविध पौराणिक वस्तूंचे संग्रहण, नोंदणी, प्रदर्शन या बाबी पाहिजे तेवढ्या प्रमाणात झाल्या नाहीत. असे असले तरी १८५७ पर्यंत या काळात जवळजवळ एक डझन वस्तुसंग्रहालये सुरु करण्यात आली. त्यापैकी काही प्रमुख संग्रहालये पुढीलप्रमाणे.
१) मद्रास येथे मद्रास सोसायटीने सेंट जॉर्ज या ठिकाणी स्थापन केलेले मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय.
२) सर विल्यम कॅरे, यांनी कलकत्ता यांनी कलकत्ता येथे स्थापन केलेले कॉलेज संग्रहालय.
३) सिंध येथील आयुक्त सर बिलट फरेर यांनी कराची येथे स्थापन केलेले व्हिक्टोरिया वस्तुसंग्रहालय.
४) बॉम्बे सोसायटी यांनी मुंबई येथे स्थापन केलेले टाऊन बॅरेंक्स वस्तुसंग्रहालय.
अशा प्रकारे १८५७ पर्यंत वस्तुसंग्रहालयाचा भारतात विकास झाला. परंतु १८५७ च्या उठावामुळे भारतीय व ईस्ट इंडिया कंपनी यांच्या मध्ये कटूता निर्माण झाली. याचा परिणाम भारतीय वस्तुसंग्रहालय चळवळीवर झाला.
ब) व्हिक्टोरियन व संरधानिक राज्यातील वस्तुसंग्रहालय चळवळ (१८५७- १८९८)
१८५८ च्या राणी व्हिक्टोरियाच्या जाहीरनाम्यानंतर भारत हे पूर्णपणे ब्रिटीश अधिपत्याखाली गेले. या कालखंडात ब्रिटिशांनी वस्तुसंग्रहालय, पुराणवस्तु संशोधन व भारतीय संस्कृतीमध्ये रस घेऊन नवीन वस्तु संग्रहालये स्थापन केली. त्याचबरोबर त्यांनी या शास्त्राचा विकास करण्यासाठी भरीव आर्थिक मदत दिली. पुरातत्त्वविद्या, नाणकशास्त्र, आलेख वस्तुसंग्रहालय शास्त्राचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यासाठी १८६१ मध्ये 'पुरातत्त्व सर्वेक्षण' विभागाची स्थापना केली. याच्या पहिल्या महा निर्देशकपदी अलेक्झांडर कनिंगहॅम यांची नियुक्ती केली. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी उत्खनने केली. याच कालखंडात त्यांना स्तुप, लेणी, पुराणवस्तु अवशेष नाणी सापडली व या सर्व कलात्मक वस्तुंचे जतन करण्यासाठी वस्तुसंग्रहालयाची स्थापना केली. १८७४ मध्ये मधूरा येथे शासकीय वस्तुसंग्रहालये स्थापन करण्यात आले. याठिकाणी मथुरा येथे कलेक्टर ग्रोवस यांच्या प्रयत्नांमुळे अनेक मुर्त्या व कलात्मक वस्तू जमा करण्यात आल्या १८८८ ते १८९८ या कालखंडात अनेक संग्रहालये राणी व्हिक्टोरिया यांच्या नावाने सुरु करण्यात आले. त्यापैकी मद्रास येथील व्हिक्टोरिया टेक्नीकल इंस्टिट्यूट प्रमुख संग्रहालय होते. या
संग्रहालयामध्ये प्रामुख्याने उत्खनात सापडेल्या वस्तुंचा व संशोधनाचा समावेश होता.
याच कालखंडात वस्तुसंग्रहालय उभारणीमध्ये भारतीयानी विशेष रस घेतला होता व त्यांनी आपापल्या संस्थानांमध्ये संग्रहालये। णून
भारतातील संग्रहालय चळवळीस उर्जित अवस्था प्राप्त झालेली होती. त्यांच्या प्रयत्नांमुळेच या कालखंडात स्थापन केलेल्या १६ संग्रहालयापैकी ११ संग्रहालये संस्थानिकांनी स्थापन केली. अशी संग्रहालये बहुतांशी 'महाराजा वस्तुसंग्रहालय' म्हणून ओळखली जातात.
त्यातील काही संग्रहालये पुढिलप्रमाणे :
१) त्रावणकोरच्या महाराजांनी स्थापन केलेले त्रिवेंद्रम वस्तुसंग्रहालय.
२) म्हैसुरच्या महाराजांनी स्थापन केलेले बंगलोरचे वस्तुसंग्रहालय.
३) जयपूर, राजकोट, उदयपूर, विजयवाडा येथील संस्थानिकांनी बांधलेली
वस्तुसंग्रहालये.
क) ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या काळातील वस्तुसंग्रहालयाची चळवळ (१८९९- १९२८):
या कालखंडाची सुरुवात लॉर्ड कर्झनच्या (१८९९-१९०५) कारकिर्दीपासून होते. त्यांची व्हाईसरॉय पदी नेमणूक झाल्यानंतर त्यांनी भारतीय संस्कृती, कला व स्थापत्या मध्ये रस घेऊन भारतीय स्मारकाच्या संरक्षणासाठी प्रयत्न सुरु केले. त्यांनी पुरातन सर्वेक्षण विभाग' या खात्यांचा विस्तार केला. १९०२ मध्ये सर जॉन मार्शल यांची पुरातत्व खात्यांचे महानिर्देशक म्हणून नेमणूक करुन भारतातील प्राचीन ऐतिहासिक स्मारकांचे सर्वेक्षण करण्यासाठी संस्था स्थापन केली. त्यांच्याच कारकिर्दीत सिंधू संस्कृतीचा शोध लागला आणि या संस्कृतीच्या महत्त्वाच्या स्थळांचे उत्खनन करण्यात आले. याकालखंडात बऱ्याच महत्त्वाच्या लेणी, मंदिरे, स्तुपे, अवशेष, स्थळे, मुर्त्या, आलेख इत्यादींचा शोध लागला. जेव्हा लॉर्ड कर्झनने इ.स. १९०० मध्ये ताजमहालला भेट दिली तेव्हा तो ते शिल्पवैभव पाहून भारावून गेला. परंतु त्यावेळस ताजमहालची वाईट स्थिती पाहून दुःखी झाला. म्हणून त्यांनी या सर्व लेणी, शिल्पवैभव, स्मारक इत्यादींचे संरक्षण करण्याचा निर्णय घेतला. आणि. इ.स.१९०४ मध्ये 'प्राचीन भारतीय स्मारक संरक्षण कायदा' पास केला. स्मारकाची कोणत्याही प्रकारची हानी करणाऱ्यास कायदेशीर कारवाई म्हणजे दंड किंवा कैद यांची तरतूद या कायद्यात केली होती, लॉर्ड कर्झनच्या कारकिर्दीतच मुंबई येथील लष्करी केद्रांचे रुपांतर वस्तुसंग्रहालयात करण्यात आले आणि त्याचे नावं 'प्रिन्स ऑफ वेल्स वस्तुसंग्रहालय' असे देण्यात आले. आता त्यास 'छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय' या नावाने ओळखले जाते. १९०६ मध्ये कलकत्ता येथे व्हिक्टोरिया स्मारक संग्रहालयाची स्थापना झाल्याने लॉर्ड कर्झनने उराशी बाळगलेली स्वप्न साकार झाले व त्याचे उद्घाटन १९२१ मध्ये झाले.
याच कालखंडात अनेक वस्तुसंग्रहालये स्थापन झाले त्यातील काही पुढिलप्रमाणे-
१) बारीपाड्याचे वस्तुसंग्रहालय (१९०३)
२) सारनाथचे वस्तुसंग्रहालय (१९०४)
३) आग्राचे वस्तुसंग्रहालय (१९०६)
४) चानरबाचे वस्तुसंग्रहालय (१९०८)
५) दिल्ली किल्यातील वस्तुसंग्रहालय (१९०९)
६) ग्वाल्हेरचे वस्तुसंग्रहालय (१९१०)
७) बिजापुरचे वस्तुसंग्रहालय (१९१२)
८) ग्वाल्हेरचे पुरातत्त्व वस्तुसंग्रहालय (१९२२)
९) लाहोरचे वस्तुसंग्रहालय (१९२८)
ड) संग्रहालयाच्या चळवळीतील जनतेचा सहभाग (१९२८ ते १९४७):
या कालखंडात भारतामध्ये स्वातंत्र्य चळवळ जोरात होती. मात्र संग्रहालय चळवळीचा विकासही जोरात होता. या स्वातंत्र्य चळवळीच्या वेळेतसुद्धा अनेक वस्तुसंग्रहालये स्थापन झाले. या चळवळीत सरकारचा प्रत्यक्ष सहभाग तर होताच परंतु त्याचबरोबर भारतीय संघराज्ये संस्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्था, विद्वतसंस्था, शिकलेला समाज व महत्त्वाच्या व्यक्ति यांनीसुद्धा या वस्तुसंग्रहालय चळीवळीत मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले.
या कालखंडात मारच्वाम यांची 'ब्रिटिश म्युझियम असोशिएशनच्या' सचिवपदी हारग्रिव्हज यांची 'भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण' विभागाच्या महानिर्देशकपदी नियुक्ती करण्यात आली. या काळात त्यांच्या व जनतेच्या प्रयत्नाने संपूर्ण भारतामध्ये जवळजवळ १०५ संग्रहालये स्थापन करण्यात आली. मास्खाम आणि हारग्रिव्हज यांनी या सर्व संग्रहालयांचे निरीक्षण करुन एक अहवाल तयार केला. त्यात त्यांनी संग्रहालयाचे रेकॉर्ड व्यवस्थित ठेवले जात नाही, संग्रहालयाचे अभिरक्षक प्रशिक्षित नाहीत, फंडाची टंचाई असे निष्कर्ष काढले.
या कालखंडात अनेक संग्रहालये स्थापन झाले त्यातील काही प्रमूख पुढिलप्रमाणे.
१) तक्षशिला वस्तुसंग्रहालय, पंजाब (१९२८)
२) सातारा येथील ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय (१९३०)
३) धुळे येथील राजवाडे संशोधन मंडळ (१९३२)
४) श्री चित्रालयम वस्तुसंग्रहालय, त्रिवेंद्रम (१९३४)
५) मंदिर वस्तुसंग्रहालय, श्रीरंगपट्टणम (१९३५)
६) राज-राजा चोळ वस्तुसंग्रहालय, तंजावर (१९३५)
७) राज्य वस्तुसंग्रहालय, गुवाहाटी (१९४०)
तथापी याच कालखंडात १९३९ ते १९४५ या काळात दुसऱ्या महायुद्धामुळे वस्तुसंग्रहालय चळवळीचा विकास थोड्याप्रमाणात थांबला. परंतु मॉर्टीनर व्हिलर यांच्या पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या महानिर्देशकपदी (१९४४-१९४८) नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी या शास्त्राच्या विकासासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नामुळेच या चळवळीचे पुनरुज्जीवन झाले व त्यांनी स्थळ संग्रहालये ही संग्रहालयाची स्वतंत्र शाखा सुरु केली.
इ) स्वतंत्र भारतातील वस्तुसंग्रहालयाची चळवळ (१९४७ नं 130/315 १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर भारत, नाणे वस्तुसंग्रहालये ही राज्याच्या अखत्यारीत आली. परिणामी जी संग्रहालये सुरुवातीपासून केंद्र सरकारच्या नियंत्रणात होती ती संग्रहालये सोडून बाकी सर्व संग्रहालये ही राज्य सरकारच्या अखत्यारित आली. परंतु वस्तुसंग्रहालयाच्या चांगल्या संरक्षणासाठी व नियंत्रणासाठी खालील प्रमाणे वर्गीकरण करण्यात आले.
अ) सरकारी नियंत्रणाखाली असलेली वस्तुसंग्रहालयेः
१) राष्ट्रीय स्तर
२) राज्य स्तर
ब) स्थानिक स्वराज्य संस्थाच्या नियंत्रणाखाली असलेली वस्तुसंग्रहालये.
क) स्वायत्त संस्थानी चालविलेली वस्तुसंग्रहालये.
ड) व्यक्तिगत मालकीची वस्तुसंग्रहालये
इ) विद्यापीठांची वस्तुसंग्रहालये.
स्वातंत्र्योत्तर काळात अनेक विद्यापीठात प्रथमच वस्तुसंग्रहालयशास्त्र या विषयाचा समावेश करण्यात आला. पुरातत्त्वशास्त्राला जोडविषय म्हणून हा विषय शिकविण्यात येऊ लागला. बडोदा, कलकत्ता व दिल्ली येथे या विषयाचा वेगळा अभ्यासक्रम तयार करण्यात आला. ज्यात वस्तुची मांडणी, आवश्यक प्रकाशयोजना, व एकंदरीत व्यवस्थापन इत्यादी बाबी शिकवल्या जाऊ लागल्या. लोकशिक्षण साधणाऱ्या प्रवृत्तीला स्वतंत्र भारतात चालना मिळाली. बहुजन समाजाला शिक्षण देण्याची भूमिका वस्तुसंग्रहालयाची झाल्यामुळे त्यांची विभागणी वेगवेगळ्या प्रकारामध्ये झाली.
उदा. ग्रामीण वस्तुसंग्रहालये, शहरी वस्तुसंग्रहालये इत्यादी.
Comments
Post a Comment