टी वाय बी ए सेमिस्टर६ इतिहास पेपर नंबर 6
वस्तु संग्रहालयशास्त्र भारतामध्ये वस्तुसंग्रहालयाचे स्थान अत्यंत मोलाचे आहे. कारण भारताच्या प्राचीन कलासंस्कृतीचा वारसा जतन करुन ठेवण्याचे काम वस्तुसंग्रहालये करतात. एका पिढीपासून दुसऱ्या पिढीला हा बहुमोल ठेवा व त्याचे ज्ञानप्रसाराचे कार्य वस्तुसंग्रहालये करतात. यामुळेच देशांमध्ये सांस्कृतिक एकता व एकात्मता टिकून राहते. भारतासारखा देश जो विविधतेने नटलेला आहे. त्यामध्ये आपणांस भाषिक, धार्मिक, प्रांतिक, सांस्कृतिक विविधता दिसून येते. तरीसुद्धा या विविधतेमध्ये सुद्धा वस्तुसंग्रहालयामुळेच एकता टिकून राहिली आहे. तीचे संगोपन, संवर्धन व जोपासन करण्याचे श्रेय वस्तुसंग्रहालयानांच द्यावे लागेल. म्हणूनच 'डॉ. सत्य प्रकाश वस्तुसंग्रहालये' ही सार्वजनिक संस्था आहे असे म्हणतात. वस्तु संग्रहालये ही लोकशिक्षणाची महत्त्वाची केंद्रे मानली जातात. भारतासारख्या लोकशाही...